पिंपरी (Pclive7.com):- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमीत्त देश स्वातंत्र्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावणा-या आणि स्वातंत्र्य संग्रामात बलिदान देणा-या स्वातंत्र्य सैनिक व कुटुंबियांचा माजी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांच्यावतीने सन्मान करण्यात आला. देशभरात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. नागरिकांच्या मनात देश प्रेमाची भावना निर्माण होण्यासाठी आणि देशाचा जाज्वल्य इतिहास पुढ़च्या पिढ़ीला स्मरण राहुन प्रेरित व्हावा, या उददेशाने “क्रांतीविर चापेकर नगर” येथे ३०० पेक्षा अधिक महान क्रांतीकारकांचे चित्रप्रदर्शन व माहितीपटाचे सादरीकरण करण्यात आले होते. देश स्वातंत्र्य मिळवून देणा-या महान क्रांतीकारकांचा प्रेरणादायी इतिहास उलगडून त्यांच्या कुटुंबियांचा सत्कार यावेळी करण्यात आला.

देश स्वातंत्र्याचे ७५ व्या वर्षाचे औचित्य साधून १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत “ हर घर तिरंगा” हा उपक्रम राबविण्यात आला. यानिमीत्त माजी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांच्यावतीने दि. १२ ते १७ ऑगस्ट या कालावधीत क्रांतीवीर चापेकर नगर, स्पाईन रोड, चिंचवडे नगर (जुने रावजी गार्डन) याठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये, स्वातंत्र्य सेनानी, गोवा मुक्ती संग्रामातील सेनानी, आणीबाणीतील सत्याग्रही अथवा त्यांचे कुटूंबीय तसेच १९४७ साली स्वातंत्र्य दिवस पाहिलेले नागरिक यांचा सन्मान सोहळा पार पडला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पिंपरी चिंचवड जिल्हा कार्यवाहक महेश्वर मराठे, भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे, विधान परिषदेच्या आमदार उमाताई खापरे, आयुक्त राजेश पाटील, शंकरशेठ जगताप, पदमश्री डॉ. गिरीश प्रभुणे, मुकुंदराव कुलकर्णी, संदीप जाधव, माजी महापौर उषा ऊर्फ माई ढोरे, माजी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी नगरसेवक मोरेश्वर शेडगे, सामाजिक कार्यकर्ते शेखर चिंचवडे, महिला मोर्चाच्या पल्लवी वाल्हेकर, प्रभाग अध्यक्ष भगवान निकम, कामगार आघाडी धिरज धाकड, प्रदीप पटेल, सचिन महाले, नवनाथ वाघमारे, संदीप महाजन, कैलास रोटे, रविंद्र कुवर, प्रल्हाद पाटील, माऊली जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
१९७५ आणीबाणीत सहभागी झालेले स्वर्गीय राम कुलकर्णी, श्रीमती कुलकर्णी, श्रीम. मुणगेकर, श्रीम. नाटेकर, श्रीम. ताम्हणकर, श्रीम. देव, प्रल्हाद जाधव, शरद रवांडे, जनार्धन वाठारकर, भालचंद्र देशपांडे, राम कुलकर्णी, प्रशांत हरहरे, किशोर काणे, विजय पोरे, पांडू भांडेकर, ज्ञानदेव गायकवाड, सुधीर केसकर, बाळू मोकाशी, प्रकाश मिठभाकरे, धुंडीराम ओक, शंकर किल्ले, विजय रहम, नाथा पुराणिक, संतोष काळे, सतिष बोरकर, रुईकर जोशी, विश्वास खोले, बंधू पेठे, मोहन गुपचूप, प्रसाद देशपांडे, प्रकाश डांगे, भास्कर भदाणे आदी ३८ सत्याग्रहींच्या कुटुंबियांचा सत्कार करण्यात आला. तसेच, गोवा मुक्ती संग्रामातील स्वर्गीय बाळ पुराणिक, नारायण बोराटे, विनायक वाघमारे, दादा केसकर, गणेश पेशवे, वसंतराव भावे आदी स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबियांचा सत्कार यावेळी झाला. १९४२ मधील स्वातंत्र्य सेनानी स्वर्गीय आण्णा सायकर, जनार्धन मिरजकर, गजानन लुणावत, नहार, विठ्ठल वस्ते, शेठीया, भालेकर, सिद्ध पाठकी, धोंडोपंत रबडे यांच्या कुटुंबियांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बिभीषण चौधरी यांनी केले.
पिंपरी चिंचवड शहराचे ग्रामपंचायत, नगरपालिका ते महापालिका जडण-घडणमध्ये शहराला महत्वपुर्ण योगदान देणारे आजी- माजी सरपंच, नगराध्यक्ष, महापौर व पोलिस पाटील अथवा कुटूंबियांचा सन्मान सोहळा दि.१७ रोजी आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रकाशराव मीठभाकरे उपस्थित राहतील. तसेच, देश भक्ती वर गितांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. क्रांतीवीर चापेकर नगरी येथे देशाच्या महान क्रांतीकारकांचा सोनेरी इतिहासाविषयी चित्र प्रदर्शन पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने नागरिक, शाळा, महाविद्यालये, विरंगुळा केंद्र, पर्यावरण प्रेमी, वृक्षप्रेमी, सोसायटी, सामाजिक व राजकीय संघटनांनी हजेरी लावून देश स्वातंत्र्याच्या चळवळीत सहभाग घेतला.






















Join Our Whatsapp Group