पिंपरी (Pclive7.com):- शिवसेना पिंपरी चिंचवड शहरप्रमुख सचिन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली उपशहरप्रमुख हरेश नखाते यांच्या नेतृत्वाखाली रहाटणी फाटा या ठिकाणी शिवसेना सभासद नोंदणी करण्यात आली.

यावेळी कष्टकरी कामगार बंधु व भगिनी यांनी सहभाग नोंदवुन आम्ही उद्धवजी ठाकरे यांच्या सोबत कायम स्वरुपी राहणार असा शब्द देऊन सभासद नोंदणी करणाऱ्या शिवसेना पदाधिकारी यांचे कौतुक केले. अभियानाच्या निमित्ताने शिवसेना जनसामान्यात किती रुजलेली आहे, हे पुन्हा एकदा दिसून आले.

यावेळी शिवसेना उपशहरप्रमुख हरेश नखाते, विभाग प्रमुख गोरख पाटील निलंगेकर, युवासेना आयटीसेल प्रमुख रविकिरण घटकार, शाखा प्रमुख विकास काजवेे, दत्ता गिरी, शिवसैनिक दिपक वाघ, युवराज दाखले, दादा देडे, दत्ता कांबळे, स्वत्निल जाधव आदी उपस्थित होते.
या सभासद नोंदणी अभियानाचे आयोजन शिवसेना रहाटणी-काळेवाडी विभागाच्या वतीने रविकिरण घटकार व युवराज दाखले यांनी केले होते.






















Join Our Whatsapp Group