पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते, नगरसेवक विनोद नढे यांच्या मातोश्री सौ. रंजना जयवंत नढे यांचे आज (१ सप्टेंबर) रोजी पहाटे दुःखद निधन झाले. त्या ५९ वर्षाच्या होत्या. काळेवाडी येथील स्मशानभूमीत सकाळी ११.३० वाजता अंत्यविधी करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले आणि दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे.
![](https://pclive7.com/wp-content/uploads/2022/08/IMG-20220817-WA0044-300x300.jpg)
रंजना नढे या गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. त्यांच्यावर उपचार सुरु होते. परंतु आज पहाटे त्यांनी शेवटचा श्वास घेत जगाचा निरोप घेतला. त्यांच्या जाण्याने नढे कुटुंब व काळेवाडी परिसरात शोककळा पसरली आहे.
रंजना नढे यांनी राजकारण, समाजकारण, संप्रदाय आणि व्यावसायिक क्षेत्रात दोन्ही मुलांना योग्य ते संस्कार दिले. काळेवाडी सह पंचक्रोशीत आदर्श माता म्हणून परिचित होत्या. त्यांच्या जाण्याने नढे कुटुंबियांवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.