पिंपरी (प्रतिनिधी):- मुंबईतील परेल रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगरा चेंगरीच्या घटनेनंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. अहमदाबाद ते मुंबई बुलेट ट्रेनची गरज काय? असा सवाल उपस्थित करत त्यांनी जोरदार टीका केली. पिंपरी महापालिकेतील विकास कामांचा आढावा बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
अजित पवार म्हणाले की, या बुलेट ट्रेनचा सर्व फायदा फक्त अहमदाबादला होणार आहे. १ हजार कोटीहून अधिक खर्च या बुलेट ट्रेनवर होणार आहे. हा पैसा जर रेल्वेला सुविधांवर खर्च केला तर वाढते अपघात रोखले जातील. प्लँटफाँर्म विकसित केले पाहिजे. सिग्नल यंत्रणा सुधारली तर वाढते अपघात रोखले जातील. मुंबईतील परेल स्टेशनवर निष्पाप लोकांचा बळी गेला. सरकारला कुठल्याही गोष्टीचे गांभिर्य नाही. राज्यातले नेतृत्व काही बोलत नाहीत अशा शब्दात अजित पवारांनी जोरदार टीका केली.






















Join Our Whatsapp Group