पिंपरी (प्रतिनिधी):- सध्या राज्यमंत्री मंडळात ‘वर्णी’ लागावी यासाठी एकीकडे शहरातले नेते प्रयत्न करत असताना अजित पवारांनी मात्र या नेत्यांना त्यांची जागा दाखऊन दिली आहे. आता हे नेते मंत्रीपदाची स्वप्ने पाहत आहेत, पण या नेत्यांना ‘मी लहानाचे मोठे केले’, ‘त्यांची ओळख माझ्यामुळे झाली’ ते ‘स्वार्थासाठी’ तिकडे गेले, ज्यावेळी दिवस बदलतील त्यावेळी ते कुठे असतील ते तुम्ही पाहा अश्या शब्दात अजित पवारांनी शहरातील नेत्यांची जागा काय आहे हे दाखवून दिले आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने सुरू केलेली विकासकामे रखडल्यामुळे अधिकाऱ्यांची झाडाझडती घेण्यासाठी अजित पवार आज पिंपरी महापालिकेत आले होते. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. साहजिकच त्यात शहरातल्या राजकीय घडामोडींवर भाष्य केले. शहरातील आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे हे मंत्रीमंडळात वर्णी लागावी यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यावर बोलताना अजित पवारांनी त्यांची आपल्या दृष्टीने काय किंमत आहे हे अप्रत्यक्षपणे सांगितले.
मुळात पिंपरी चिंचवड मधील बहुतांश नेते हे अजित पवारांनी तयार केलेले आहेत. त्यात लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांचाही समावेश आहे. पण ज्या वेळी अजित पवारांना सर्वाधिक गरज होती, त्याच वेळी या दोघांनी त्यांची साथ सोडली आणि भाजपचा रस्ता धरला. त्या मुळे अजित पवारांचे पिंपरी चिंचवड मधील साम्राज्य खालसा झाले. त्याची सल अजित पवारांच्या मनात आजही आहे. म्हणूनच अजित पवारांनी अप्रत्यक्ष रित्या ‘गद्दारी’ केलेल्या या नेत्यांना त्यांची जागा दाखऊन देताना ‘धमकीवजा’ इशारा दिला आहे. आता त्याचा शहरातल्या स्थानिक नेत्यांवर काय परिणाम होतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.






















Join Our Whatsapp Group