पिंपरी (Pclive7.com):- अपघातांचं सत्र सुरु असतानाच आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. पुणे- मुंबई एक्स्प्रेस वेवर उर्से टोल नाका येथे नारायण राणे यांच्या कुटुंबियांच्या कारचा अपघात झाला.

अपघात किरकोळ स्वरुपाचा होता. त्यावेळी कारमध्ये राणेंचे सुपुत्र नितेश राणे यांची पत्नी, मुलं आणि नातेवाईक होते, अशी माहिती पिंपरी-चिंचवड पोलिसांनी दिली.
सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास उर्से टोल नाका येथे हा अपघात झाला. मुंबईहून पुण्याच्या दिशेने येताना हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. उर्से टोल नाका येथे टोल भरण्यासाठी राणे कुटुंबीय प्रवास करत असलेली कार रांगेत थांबली होती. त्याचवेळी मागे टोल भरण्यासाठी थांबलेल्या ट्रकने राणे कुटुंबियांच्या मोटारीला किरकोळ धडक दिली. यात कारचं किरकोळ नुकसान झालं असलं तरीही सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालं नाही.
























Join Our Whatsapp Group