पिंपरी (Pclive7.com):- महाराष्ट्र नव निर्माण सेनेच्या विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी आज (दि.०८) पिंपरी चिंचवड शहरातील विविध सार्वजनिक गणपती मंडळांना भेट दिली व गणपती चे दर्शन घेतले. यामध्ये मोशी, इंद्रायणी नगर, खराळवाडी, राम नगर, चिंचवड, पिंपरी, काळेवाडी, डांगे चौक गणेश नगर, किवळे या ठिकाणच्या मंडळाना भेट दिली.
यावेळी अमित ठाकरे यांच्यासोबत मनसे शहर अध्यक्ष सचिन चिखले, विद्यार्थी सेना अध्यक्ष हेमंत डांगे, उपाध्यक्ष बाळा दानवले, विभाग अध्यक्ष मयूर चिंचवडे, अंकुश तापकीर, विशाल मानकरी, दत्ता देवतरासे, प्रतिक शिंदे, श्रध्दा देशमुख, अक्षय नाळे हे पदाधिकारी उपस्थित होते.