वाकड (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात गणेश विसर्जन करण्यासाठी वाकड येथील द्रौपदा मंगल कार्यालयाजवळ राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल वाकडकर यांनी उभारलेल्या पर्यावरण पूरक विसर्जन हौदात तब्बल ३००० पेक्षा अधिक मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. गेल्या काही वर्षांपासून प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींचे वाढलेले प्रमाण पर्यावरणासाठी धोकादायक ठरत आहे. त्याच अनुषंगाने नदी, नाले, ओढे प्रदूषित होऊ नयेत पर्यावरणाचा समतोल राखला जावा या उद्देशाने या विसर्जन हौदाची निर्मिती करण्यात आली होती.
शहरातील नागरिकांनी गणेशोत्सवाच्या दुसऱ्या दिवसापासूनच मोठ्या उत्साहाने या विसर्जन हौदात गणेश विसर्जन करण्यास सुरुवात केली. विसर्जन घाट परिसरात सुसज्ज व्यवस्था करण्यात आली होती. आठ स्वयंसेवकांच्या देखरेखीत गणेश विसर्जन आणि मुर्तीदान करण्याची व्यवस्था उपलब्ध करण्यात आली होती. निर्माल्य गोळा करण्यासाठी निर्माल्य कलश उभारले होते.
येथील विसर्जित मूर्ती श्री फाउंडेशन या संस्थेकडे सुपूर्द केल्या जातील आणि त्या रिसायकल करून पुढील वर्षी अल्प किमतीत विक्रीसाठी उपलब्ध होतील. यातून येणारा निधी अनाथ आश्रमातील मुलांच्या शिक्षणावर खर्च केला जातो. नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते पार्थदादा पवार यांनी या विसर्जन घाटास भेट देऊन विशाल वाकडकर यांच्या स्तुत्य कामाचे कौतुक केले होते.
शहरातील नागरिकांनी गणेश विसर्जन करण्यासाठी पर्यावरण पूरक हौदाचा उपयोग करून पर्यावरण रक्षण करण्यासाठी अमूल्य योगदान दिले आहे, त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो असेही विशाल वाकडकर यांनी म्हटले आहे.
Tags: ३००० पेक्षा अधिक मूर्तींचे विसर्जनपर्यावरण संवर्धनाचा संदेशपर्यावरणपूरक विसर्जन हौदप्रदेश उपाध्यक्षराष्ट्रवादीवाकडविशाल वाकडकर