पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे सौदागर – रहाटणी परिसरातील अनेक प्रलंबित कामे लवकरच मार्गी लागणार आहेत. पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्यासोबत माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांची बैठक बुधवारी (दि.२८) पार पडली.

या बैठकीत शत्रुघ्न काटे यांनी पिंपळे सौदागर, रहाटणी परिसरातील अनेक प्रलंबित प्रश्न आयुक्त शेखर सिंह यांच्या निदर्शनास आणून दिले. यात प्रामुख्याने १) स्मार्ट सिटी प्रकल्पा अंतर्गत उर्वरित कामे वेगाने पूर्णत्वास नेणे, २) स्मार्ट सिटी प्रकल्प अंतर्गत कुणाल आयकॉन रस्त्याचे कॉक्रीटीकरणाचे काम लवकरात लवकर सुरू करणे, ३) कुणाल आयकॉन रस्त्याच्या मागील बाजूस मिलीटरी हद्दीलगत सुरू असलेले १८ मी. रुंद रस्त्याचे काम मार्गी लावणे, ४) भामा आसखेड प्रकल्प मधून मिळणारे पाण्याचे वाटप बाबत लवकरात लवकर नियोजन करावे म्हणजे पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागेल, ५) CBSE आणि ICSE बोर्ड मधून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना समाज विकास विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती योजनेत सहभागी करून घेणे. ६) BMX पार्क , योगा पार्क या प्रकल्पाचे काम लवकरात लवकर सुरू करणे. ७) गेली कित्येक वर्षे प्रलंबित असलेले HCMTR रस्त्याचे प्रश्न मार्गी लावणे. ८) पिंपळे सौदागर मधील प्रलंबित DP रस्तेबाबत लक्ष देऊन मार्गी लावणे.
असे अनेक प्रश्न शत्रुघ्न काटे यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी आयुक्त शेखर सिंह यांनीही सर्व प्रश्न काळजीपूर्वक समजून घेत सर्वचे सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला. या बैठकीत महाव्यवस्थापक स्मार्ट सिटी प्रकल्प अशोक भालकर, कार्यकारी अभियंता मनोज सेठिया, माजी नगरसेवक शशिकांत कदम, सागर अंघोळकर, राजेंद्र राजापूरे, अंबरनाथ कांबळे, माजी नगरसेविका उषाताई मुंडे व इतर अधिकारी उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group