पिंपरी (Pclive7.com):- चिंचवडमधील श्री शिवाजी उदय मंडळ व सुनेत्रा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने अखिल तानाजीनगर नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार दि.२६ सप्टेंबर ते बुधवार दि.५ ऑक्टोबर २०२२ या कालावधीमध्ये रोज सायंकाळी ७:३० ते रात्री १० पर्यंत रास दांडिया / गरबा नृत्य / रावण दहन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती अखिल तानाजीनगर नवरात्र उत्सवाच्या संयोजिका माजी महापौर अपर्णा डोके यांनी दिली.

कार्यक्रमामध्ये शनिवारी १ ऑक्टोबर २०२२ रोजी सायंकाळी ५ वाजता महिलांसाठी महाभोंडला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दिनांक २ ऑक्टोबर २०२२ रोजी रात्री ८ वाजता दांडिया स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे.

तसेच विजयादशमीनिमित्त दि. ५ ऑक्टोबर २०२२ रोजी सायंकाळी ७ वाजता भव्य अशा तीस फूटी रावण दहन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी परिसरातील नागरिकांनी नवरात्र उत्सव कार्यक्रमास जास्तीजास्त संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन अपर्णा डोके यांनी केले आहे.
Tags: अखिल तानाजीनगर नवरात्र उत्सवअपर्णा डोकेचिंचवडमाजी महापौरश्री शिवाजी उदय मंडळसुनेत्रा प्रतिष्ठान