पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात स्थित संभाजीनगर येथील सुबोध माध्यमिक विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी आपले स्वर्गवासी मित्र कै.अक्षय गायकवाड, कै.रोहित आझाद आणि कै.अक्षय बिडकर या विद्यार्थ्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या आठवणीचं झाड लावलं आहे. या विद्यार्थ्यांच्या आठवणी वृक्षरुपात साठवून आपली मैत्री या वृक्षरुपी मित्रा सोबत जपण्यासाठी या वृक्षारोपण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.

यावेळी सुबोध माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्ग तसेच माजी विद्यार्थी यांच्या हस्ते स्वर्गवासी माजी विद्यार्थी यांच्या नावाने वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी सुबोध माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. जगताप मॅडम, तसेच शिक्षिका सौ.कोरडे मॅडम, सौ. सकपाळ मॅडम, सौ. देशमुख मॅडम, सौ.फडके मॅडम, सौ. दुसाने मॅडम, सौ.पवार मॅडम आणि शिक्षक श्री.खोपकर सर, श्री. काटवटे सर ,श्री.एस.बी.शिंदे सर, श्री पांचाळ सर, श्री. नलावडे सर, श्री. एम. एम शिंदे सर, श्री. कुडाळ सर, श्री. तेटू सर तसेच शिक्षकेतर कर्मचारी श्री. गायकवाड, सौ.मोरे, श्री. गावडे आदी उपस्थित होते.

यावेळी माजी विद्यार्थी कोमल घोडके/ हवरगी, गौरी माळी/ बाविस्कर, सूरज कसबे, शुभम काशिद, जगदीश चव्हाण, ऋषिकेश भींगारदे, संकेत पवार, वैभव वाळुंज, प्रदीप खट, महेश जाधव आपल्या स्वर्गवासी मित्रांच्या आठवणींमध्ये भाऊक झाल्याचं दिसून आले. स्वर्गवासी झालेले मित्र वृक्षरुपात जेथे त्याची भेट झाली त्याच शाळेमध्ये वृक्षरुपात जीवंत राहणार याचं समाधान या माजी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होतं.
Tags: चिंचवडपिंपरी चिंचवडमाजी विद्यार्थीमैत्रीचं झाडसंभाजीनगरसुबोध विद्यालयस्वर्गवासी मित्रांची आठवण