पिंपरी ( Pclive7.com):- भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांना मातृशोक झाला आहे. हिराबाई किसनराव लांडगे (वय-६९) यांचे अल्पशा आजाराने शनिवारी निधन झाले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज लांडगे यांच्या निवासस्थानी भेट दिली. तसेच, लांडगे कुटुंबियांचे सांत्वन केले.
गेल्या काही दिवसांपासून हिराबाई लांडगे संधीवात आजाराने त्रस्त होत्या. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. जंतुसंसर्गामुळे प्रकृती चिंताजनक झाल्याने शनिवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली.
नितीन गडकरी यांचा पुणे दौरा होता. दरम्यान त्यांनी महेश लांडगे यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांचे सांत्वन केले व लांडगे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी झाले.