पिंपरी (Pclive7.com):- भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांच्या मातोश्री कै. सौ. हिराबाई लांडगे यांचे देहावसन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमदार लांडगे यांचे सांत्वन केले असून, शोकसंदेश पाठवला आहे.

आमदार महेश लांडगे यांच्या मातोश्री कै. सौ. हिराबाई लांडगे यांचे दि. २४ सप्टेंबर रोजी निधन झाले. आज त्यांचा दशक्रिया विधी झाला. गेल्या दहा दिवसांत राज्यातील सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध संस्था- संघटनांचे प्रतिनिधी यांनी लांडगे यांच्या भोसरीतील निवासस्थानी सांत्वन भेट दिली आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शोकसंदेश पाठवला आहे. यासह राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह सर्वपक्षीय आमदार, खासदार, नेते, पदाधिकारी यांनी लांडगे यांना मातृशोकाच्या दु:खातून सावरण्यासाठी आधार दिला.






















Join Our Whatsapp Group