पिंपरी (Pclive7.com):- लक्षवेध स्पोर्ट्स फाउंडेशन व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला शहराध्यक्ष कविता आल्हाट यांच्यावतीने नवरात्र उत्सव निमित्त खास महिलांसाठी मोफत कॅन्सर तपासणीचे शिबिराचे आयोजन मोशी मधील स्वराज सोसायटी येथे करण्यात आले होते.

शिबिराच्या निमित्ताने महिलांमध्ये आरोग्य विषयक तक्रारींचे निराकरण करण्यात आले. यामध्ये महिलांची स्तनांचे कॅन्सर व गर्भाशय मुखाचे कॅन्सर याबाबत तपासणी करण्यात येऊन मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिरास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मोशी परिसरामध्ये नवरात्र निमित्त विविध ठिकाणी सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. परंतु महिलांसाठी आरोग्य विषयक उपक्रम राबवून कविता आल्हाट त्यांनी सामाजिक बांधिलकी जपण्याचे उत्तम कार्य केले आहे.

शहराध्यक्षा कविता आल्हाट यांनी महिला भगिंनिंसाठी सदर कॅन्सर शिबिराचे दुसऱ्यांदा आयोजन केले आहे. या उपक्रमाबद्दल महिला वर्गाकडून महिलांच्या आरोग्याबाबत जागृती होत असल्याने कविता आल्हाट यांचे विशेष आभार मानण्यात आले.





















Join Our Whatsapp Group