पिंपरी (Pclive7.com):- राज्याचे विरोधी पक्षनेते तथा पुणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री अजितदादा पवार यांचे आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत सरप्राईज व्हिजिट दिली. शहरातील विविध प्रश्नासाठी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या समवेत त्यांची चर्चा करण्यासाठी बैठक सुरू आहे. अजितदादांच्या अचानक एंट्रीमुळे महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली.

दसऱ्या दिवशी थेरगाव येथील कार्यक्रमात सोसायटीच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्याच्या प्रश्नासाठी आणि शहरातील इतर समस्यांसाठी आणि महापालिकेतील इतर कार्यक्रमांचा आढावा घेण्यासाठी अजित पवार थेट महापालिकेत दाखल झाले आहेत.
या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी नगरसेविका मायाताई बारणे, मंगलाताई कदम, माजी नगरसेवक मयूर कलाटे, राजू बनसोडे, राजेंद्र जगताप आदी उपस्थित आहेत.
Tags: अजित गव्हाणेअजितदादा पवारआमदार अण्णा बनसोडेआयुक्त शेखर सिंहनाना काटेपिंपरी चिंचवड महापालिकापिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसमयूर कलाटेमाया बारणेराज्याचे विरोधी पक्षनेतेविलास लांडेसरप्राईज व्हिजिट





















Join Our Whatsapp Group