पिंपरी (Pclive7.com):- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेशदादा लांडगे यांच्या निवासस्थानी भेट दिली. आमदार लांडगे यांच्या मातोश्री कै. सौ. हिराबाई किसनराव लांडगे यांचे नुकतेच निधन झाले. त्याबाबत लांडगे कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी मुख्यमंत्री भोसरी येथे आले होते.

मुख्यमंत्र्यांनी अत्यंत व्यस्त वेळापत्रक असतानाही लांडगे कुटुंबियांची आपुलकीने विचारपूस केली. यावेळी मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे, चिंचवड विधानसभा भाजपा निवडणूक प्रभारी शंकर जगताप, यांच्यासह स्थानिक नेते, पदाधिकारी, माजी नगरसेवक उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group