आळंदी (Pclive7.com : प्रसाद बोराटे):- आळंदी मध्ये दिवाळी निमित्त श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात दिवाळी पहाट संगीत महोत्सव २०२२ चे आयोजन करण्यात आले आहे.
शुक्रवार (गोवत्स द्वादशी) दि.२१ ऑक्टोबर रोजी पं.रघुनंदन पणशीकर यांची गायन सेवा सकाळी ६ वा.आयोजित केली असून त्यांच्या गायनाला तबला वादनाची भरत कामत, संवादिनी वादनाची अमेय बीच्चू, मृदुंग वादनाची सुजित लोहर हे साथ देणार आहेत. शनिवार (धनत्रयोदशी) दि.२२ ऑक्टोबर रोजी पं. श्रीनिवास जोशी व विराज जोशी यांची गायन सेवा सकाळी ६ वा. आयोजित केली असून त्यांच्या गायनाला तबला वादनाची महादेव सगळे, संवादिनी वादनाची गंगाधर शिंदे, मृदुंग वादनाची गंभीर महाराज अवचार हे साथ देणार आहेत.
रविवार दि.२३ ऑक्टोबर रोजी जगदीश चव्हाण यांची गायन सेवा सकाळी ६ वा. आयोजित केली असून त्यांना सहगायकाची कृष्णा ठाकर, तबला वादनाची सोहम गोराणे, मृदुंग वादनाची सुजित लोहर हे साथ देणार आहे. सोमवार (लक्ष्मीपूजन) दि.२४ ऑक्टोबर रोजी कृष्णा बोंगाणे यांची गायन सेवा सकाळी ६ वा. आयोजित केली असून त्यांना तबला वादनाची विशाल म्हात्रे, मृदुंगवादनाची किरण भोईर, संवादिनी वादनाची यश खडके, टाळ वादनाची विश्वास कळमकर हे साथ देणार आहेत.
मंगळवार दि.२५ ऑक्टोबर रोजी अमृता जोशी, मंगेश गोहाड, शिवानी शेंडे यांची गायन सेवा सकाळी ६ वा.आयोजित केली असून त्यांच्या गायनाला तबला वादनाची पराग जोशी, संवादिनी वादनाची नरेंद्र चिपळूणकर हे साथ देणार आहेत. बुधवार (भाऊबीज) दि.२६ ऑक्टोबर रोजी ऋषीकेश गांगुर्डे यांची गायन सेवा सकाळी ६ वा. आयोजित केली असून, त्यांच्या गायनाला तबला वादनाची विनय मुंढे, संवादिनी वादनाची मकरंद खरवंडीकर हे साथ देणार आहेत.