पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे सौदागर येथील पिंपरी चिंचवड कल्चरल फाउंडेशनच्या वतीने कवयित्री शांता शेळके यांच्या जन्मशताब्दीनिमित्त “वादळ वारा सुटल ग”… या त्यांच्या अजरामर गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष विजय भिसे यांनी दिली. शांताबाई शेळके यांनी लिहिलेले गाणी पृथ्वीराज थिएटर्सचे कलाकार सादर करणार आहे. दि.५ नोव्हेंबर रोजी सकाळी ११:३० ते ३ यावेळेत चिंचवड येथील कै. रामकृष्ण मोरे नाट्यगृहात हा संगीताचा कार्यक्रम होणार आहे.

यावेळी माजी आमदार विलास लांडे, नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, आर.आर.पाटील यांची सुकन्या ॲड. स्मिता थोरात, वारकरी भूषण हभप शेखर महाराज जांभूळकर, माजी नगरसेवक शंकर जगताप, शत्रुघ्न काटे, नाना काटे, माजी नगरसेविका सुजाता पालांडे, सुलक्षणा धर, निर्मला कुटे, उन्नती फौंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे, प्रेरणा बॅंकेच्या संचालिका चंदा भिसे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे. कार्यक्रमास जास्तीत जास्त नागरीकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.






















Join Our Whatsapp Group