पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सेवानिवृत्त मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांनी आम आदमी पार्टीमध्ये पुणे येथे बुधवारी (दि.९) प्रवेश केला आहे.

नुकत्याच दोन महिन्यापूर्वी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. रॉय सेवानिवृत्त झाले होते. त्यानंतर त्यांनी आपचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे काम पाहून, प्रेरित होऊन आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश केला आहे.
डॉ. रॉय यांचा पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात संपर्क आहे. येणाऱ्या काळामध्ये पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीमध्ये या प्रवेशामुळे पक्षाला कितपत फायदा होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. प्रवेशावेळी राज्य संघटक विजय कुंभार, आम आदमी पार्टी पिंपरी-चिंचवड शहर संपर्कप्रमुख वैजनाथ शिरसाट, प्रवक्ते प्रकाश हगवणे, डॉ. अमर डोंगरे, सीताताई केंद्रे, डॉ. अभिजित मोरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.





















Join Our Whatsapp Group