पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी गावातील सुहास साहेबराव कुदळे यांचा “सेव इंडिया असोसिएशन पुणे”च्या वतीने राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार २०२२ ने सन्मान करण्यात आला. १८ नोव्हेंबर रोजी पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन, घुले रोड, पुणे इथे सन्मान सोहळा संपन्न झाला.

महाराष्ट्र शासन उद्योग मंत्रालयचे प्रथम श्रेणी कर्तव्यदक्ष अधिकारी संतोष गवळी, साखर आयुक्त IAS अधिकारी शेखर गायकवाड व कृषी अधिकारी श्रीकृष्ण सावंत, अप्पर पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड IPS संजय शिंदे यांच्या हस्ते सुहास कुदळे यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी सेव इंडिया असोसिएशनच्या अध्यक्षा श्रद्धा भोर व सेंट्रल गव्हर्नमेंट प्रोजेक्ट उमेद अभियान व्यवस्थापिका शिल्पा ब्राम्हणे आदी उपस्थित होते.
सुहास कुदळे यांनी सामजिक काम करत असताना समाजासाठी भरीव असे कार्य केल्याबद्दल त्यांच्या कार्याची दखल घेत, कृषी अधिकारी पुणे श्रीकृष्ण सावंत सर यांनी सेव इंडिया असोसिएशन २०२२ राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कारासाठी त्यांची निवड केली. नुकताच पुणे इथे पार पडलेल्या सोहळ्यात सुहास कुदळे यांनी मित्र परीवारासमवेत हा पुरस्कार स्वीकारला. भविष्यात सुहास कुदळे यांची राजकीय एन्ट्री जोरदार होण्याची शक्यता आहे.






















Join Our Whatsapp Group