पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहरातील महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तू व साहित्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेच्या वतीने दरवर्षी पवनाथडी जत्रा आयोजित केली जाते. कोरोना महामारीमुळे यामध्ये खंड पडला होता. मात्र, आता पुन्हा अडीच वर्षांनंतर सांगवी येथील पीडब्ल्यू मैदान येथे १६ ते २० डिसेंबर अशी पाच दिवस पवनाथडी जत्रा पार पडणार आहे.

सांगवीमध्ये ९ मार्च २०२० ला पवनाथडी जत्रा झाली होती. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर काही दिवसांनी कोरोना महामारीचा उद्रेक सुरू झाला. परिणामी, अडीच वर्षे जत्रेचे आयोजन करण्यात आले नाही. कोरोना महामारी जाऊन सर्व निर्बंध शिथिल झाल्याने जत्रेचे आयोजन केले जाणार आहे. समाज विकास विभागाच्या या प्रस्तावाला आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी मंजुरी दिली आहे. जत्रेत महिला बचत गटांसाठी एकूण ४०० ते ४५० स्टॉल असतात. एका स्टॉलमध्ये दोन बचत गटांना जागा दिली जाते. असे एकूण ८०० ते ९०० स्टॉल असणार आहेत.






















Join Our Whatsapp Group