पिंपरी (Pclive7.com):- स्पा सेंटरच्या नावाखाली पीडित महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्या स्पा सेंटरचा मॅनेजर आणि मालकाला पोलिसांनी अटक केली. ही कारवाई शनिवारी (दि.१७) साडेसहाच्या सुमारास वाकड, हिंजवडी रोड येथे केली.
याप्रकरणी अनैतिक मानवी प्रतिबंधक कक्षाच्या पोलिस नाईक संगीता रामनाथ जाधव यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी स्पा सेंटरचा मालक अजित शंकर गोसावी (वय ४८, रा. धायरी फाटा, पुणे), स्पा सेंटरचा मॅनेजर सोनूकुमार विद्याचल कनोजिया (वय २२, रा. वारजे माळवाडी, मूळ उत्तर प्रदेश) यांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे स्पा सेंटरच्या नावाखाली पीडित महिलांकडून पैशांच्या आमिषाने वेश्याव्यवसाय करून घेत होते. यातून मिळालेल्या रकमेतून ते स्वतःची उपजीविका भागवत होते. पोलिसांनी केलेल्या कारवाईनुसार, आरोपींकडून रोख रक्कम दोन मोबाइल फोन असा एकूण ३७ हजार १२० रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला आहे.
याप्रकरणी अनैतिक मानवी प्रतिबंधक कक्षाच्या पोलिस नाईक संगीता रामनाथ जाधव यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली, त्यानंतर आरोपींना अटक केली.