रांगोळी स्पर्धेचे पारितोषिक वितरण
पिंपरी (Pclive7.com):- सर्व जबाबदाऱ्या पेलून संसारासाठी अहोरात्र झटत कुटुंबाला एकसंध ठेवणाऱ्या महिलांच्या सुप्त कलागुणांना थोडासा वाव दिल्यास त्यांना विरंगुळा मिळेलच, त्याशिवाय त्यांच्यातील कलागुणांद्वारे त्या स्वतःची, प्रत्येक घराची व पर्यायाने समाजाची प्रगती साधल्याशिवाय राहणार नाहीत असे प्रतिपादन शिवसेनेचे माजी गटनेते, नगरसेवक राहुल कलाटे यांनी वाकड येथे केले.
राहुल कलाटे आयोजित दीपोत्सव विशेष रांगोळी स्पर्धेच्या भव्य बक्षीस वितरण सोहळयात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ व मॉडेल डॉ. राधिका वाघ, गायत्री बिरारी, मृण्मयी मंगेशकर, वृषाली कलाटे, अनिता वाडघरे, दिपाली कलाटे, मनीषा वाडघरे, सावेरी कलाटे, दीप्ती कलाटे, प्रियांका कलाटे, सारिका कलाटे, उद्योजक उत्तम वाकडकर, सपना भंडारे, अनुजा कलाटे, सपना कलाटे, मोनिका कलाटे, श्रद्धा कलाटे आदी मान्यवर उपस्थित होते.
राहुल कलाटे पुढे म्हणाले, महिलांच्या कर्तुत्वाला व्यासपीठ मिळावे, त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे या हेतूने दरवर्षी विविध स्पर्धा, उपक्रम राबविले जातात त्यास सेलिब्रिटी मान्यवर देखील आवर्जून उपस्थित राहतात. महिलांना आरोग्याविषयी मार्गदर्शन करताना डॉ. वाघ म्हणाल्या, घरातील प्रत्येक सदस्याची काळजी घेणारी स्त्री स्वतःकडेच दुर्लक्ष करते पण अशा स्पर्धातून आनंद मिळतो मन प्रसन्न राहते मन प्रसन्न राहिल्यास आरोग्य उत्तम राहते त्यामुळे महिलांनी स्वतःसाठी वेळ काढत स्पर्धात भाग घेऊन स्वतःला सिद्ध करावे.
स्पर्धेचा निकाल..
प्रथम – हर्षा देशमुख, द्वितीय – स्मिता भार्गवा, तृतीय – अनुश्री अलाने, उत्तेजनार्थ – संजीवनी भरगुडे, ज्ञानेश्वरी पांचाळ या विजेत्यांना मानाची पैठणी व त्यांनी रेखाटलेल्या रांगोळीच्या चित्राचे गौरवपत्र तसेच सहभागी प्रत्येकी दोनशे महिलांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. वृषाली कलाटे यांनी विजेत्यांचे अभिनंदन करत स्पर्धेला उत्स्फुर्त प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.