पिंपरी (Pclive7.com):- पंतप्रधानांचा मन की बात कार्यक्रम जनमानसात प्रचंड प्रसिद्ध असून, दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी हा कार्यक्रम देशभरात प्रसिद्ध होत असतो. यामध्ये देशातील विविध क्षेत्रातील नागरीक सहभागी होत असतात, व प्रत्येक राज्यातील एखादे शहर लाईव्ह स्ट्रिमिंगद्वारे या कार्यक्रमामध्ये सहभागी होत असते.

उद्या रविवार दि.२५ डिसेंबर रोजी उपरोक्त कार्यक्रम पिंपरी चिंचवड मधील ऑटो क्लस्टर सभागृहात होत असून या कार्यक्रमात पिंपरी चिंचवड शहरातील विविध क्षेत्रातील नागरिकांना निमंत्रित केले आहे, अशी माहिती मन की बात पश्चिम महाराष्ट्रचे मुख्य संयोजक अमित गोरखे यांनी दिली आहे.
कार्यक्रमासाठी भाजपा शहर अध्यक्ष आमदार महेशदादा लांडगे यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. कार्यक्रमाचे संयोजन मन की बात पिंपरी चिंचवड संयोजक नंदकुमार दाभाडे करीत आहेत.






















Join Our Whatsapp Group