पुणे (Pclive7.com):- लोणावळ्यातील मंकी हिलजवळ रेल्वे इंजिनाचे हुक तुटल्याने रेल्वेचे इंजिन रुळावरुन घसरले. हि घटना आज (मंगळवार) पहाटे पावणे तीनच्या सुमारास किलोमिटर १२२/०४ येथे घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वेचे बँकर्स (इंजिन ढकलायला वापरले जाणारे यंत्र) होते आणि ५ इंजिन मिडल लेन वरून जात होते. त्यावेळी पाहिले दोन इंजिन व्यवस्थित गेले मात्र तिसरे व पाचवे इंजिन घसरले ४ थे रुळावरच थांबले. या घटनेमुळे रेल्वे वाहतूकीवर कोणताही परिणाम झाला नसल्याचे समजतेय. लोहमार्गाची दुरुस्ती करुन हा मार्ग सुरळीत करण्यात आला आहे.





















Join Our Whatsapp Group