पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरामध्ये विजेचा लपंडाव गेली अनेक दिवसांपासून चालू आहे. थेरगाव, काळेवाडी, वाकड, ताथवडे, पुनावळे, किवळे, रावेत तसेच सांगवी, पिंपळे सौदागर या भागात लाईटच्या अनेक समस्या आहे. विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत नाहीत. अनेक वेळा ऑफिसमधील फोन उचलून ठेवला जातो. अशा अनेक तक्रारी नागरिकांनी खासदार श्रीरंग बारणे यांचे कडे केल्या होत्या त्या तक्रारीची दखल घेऊन खासदार श्रीरंग बारणे यांनी आज पुणे विभागाचे मुख्य अभियंता एम.जी. शिंदे यांच्या उपस्थितीत पिंपरी येथे विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयात बैठक घेतली. या बैठकीत विद्युत वितरण कंपनीचे अधिक्षक महेंद्र दिवाकर, नगरसेवक निलेश बारणे, सचिन भोसले, रेखा दर्शिले, माई काटे, गजानन चिंचवडे व विद्युत विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाच्या विद्युत वितरण कंपनी संदर्भात नागरिक तक्रारी करूनही त्यांची दखल घेत नसल्या बाबत खासदार श्रीरंग बारणे यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. विद्युत वितरण कंपनीच्या ढिसाळ कारभाराचा पाढाच त्यांनी वाचला बारणे म्हणाले थेरगाव, वाकड, ताथवडे, पुनावळे, किवळे, रावेत, सांगावी, काळेवाडी, पिंपळे सौदागर, वाल्हेकरवाडी या भागातील असंख्य तक्रारी असून त्याची दखल घेतली जात नाही. विद्युत वितरण कंपनीच्या तक्रार निवारण केंद्राचा फोन उचलला जात नाही किवा फोन उचलून बाजूला ठेवला जातो. अनेक फिडर पिलचे दरवाजे उघडे असल्याने विजेचा दक्का लागून जीवितहानी होण्याची शक्यता आहे.
ट्रान्सफार्मर कँपिसीटी कमी असल्याने अनेक वेळा फेज जाऊन लाईट जाण्याचे प्रकार सातत्याने होतात. लाईट मीटर विद्युत विभागाकडे नसल्याने नागरिकांना लाईट मीटर मिळत नाहीत. इन्फ्रा २ मध्ये अनेक भागात भूमिगत केबल टाकून ठेवली आहे. परंतु प्रत्यक्ष कनेक्शन जोडले गेले नाहीत. बिल्डर्सला विद्युत पुरवठा तात्काळ केला जातो, परंतु सर्व सामान्य नागरिकांना अनेक फेऱ्या घालाव्या लागतात. पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढली असून शहराच्या तुलनेने स्वतंत्र विभागाचा दर्जा (सर्कल) पिंपरी चिंचवडला मिळावा जेणे करून अधिक कर्मचारी व अधिकारी मिळतील तसेच विभागात तक्रार केंद्रही वाढवता येईल.
पुणे विभागाचे मुख्य अभियंता एम. जी. शिंदे म्हणाले विद्युत वितरण कंपनीच्या बाबत आम्ही सर्व तक्रारीची दखल घेतली असून येत्या महिनाभरात यावर उपाय योजना करून या पुढे नागरिकांच्या तक्रारीची दखल कोणी अधिकारी घेत नसेल तर त्यावर कारवाई केली जाईल. तसेच नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही या बाबत खबरदारी घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्याचे खासदार श्रीरंग बारणे यांनी प्रसिद्धिस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.





















Join Our Whatsapp Group