पिंपरी (Pclive7.com):- CMS छत्रपती मराठा साम्राज्य ऑर्गनायझेशन या सामाजिक संघटनेच्या दिनदर्शिका २०२३ चे अनावरण सोहळा संपन्न झाला. दि.१५ जानेवारी रोजी दिनदर्शिका अनावरण सोहाळा पद्मश्री पोपटराव पवार साहेब व जेष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे ह्या मान्यवरांच्या उपस्थितीत राळेगणसिद्ध येथे थाटामाटात पार पडला.

यावेळी पद्मश्री पोपटराव पवार साहेब व जेष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे ह्यांना CMS च्या केलेल्या समाजकार्याची माहिती सांगण्यात आली. CMS संघटनेचे समाजकार्यात योगदान देणाऱ्या CMS ऍडमिन टीमचे कौतुक त्यांनी केले. पुढील समाजकार्यास शुभेच्छा दिल्या.
CMS दिनदर्शिका अनावरण सोहळ्यास CMS ऍडमिन टीम मधील संदीप नवसुपे, मनोज सोनवणे, संजय शिंदे, अशोक गाडे, भरत सूंबे, संतोष बेरड, मयूर सोनवणे, सुरेंद्र खाकाळ, रोहिनीताई वाघमारे तसेच CMS सभासद वेळात वेळ काढून उपस्थित होते.
Tags: Anna HajareCMSअण्णा हजारेअनावरणछत्रपती मराठा साम्राज्य ऑर्गनायझेशन संघटनेच्या दिनदर्शिकेचे अनावरणदिनदर्शिका





















Join Our Whatsapp Group