पिंपरी (Pclive7.com):- अर्थमंत्री निर्मला सीतारामन (budget 23-24) यांनी 2023-24 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांच्या विकासावर अधिक भर दिला आहे. रोजगार निर्मिती लक्षात घेऊन सरकारने भांडवली खर्चात वाढ केली आहे.
आजचा अर्थसंकल्प म्हणजे खऱ्या अर्थाने देशाला नवी दिशा देणार अर्थसंकल्प होय, यामध्ये सर्वच आर्थिक बाजूचा विचार करून हा अर्थसंकल्प मांडला गेला आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे हे मात्र निश्चित आहे. शहर व ग्रामीण भागातील नागरिकांचा समतोल राखत हा अर्थसंकल्प आज मांडला गेला आहे. त्यामुळे आजचा अर्थसंकल्प देशाला नवी दिशेला देणारा ठरणार आहे असे भाजपा प्रदेश सचिव अमित गोरखे म्हणाले.

नवीन कर प्रणालीमध्ये वैयक्तिक आयकरात ५ स्लॅब तयार करण्यात आले आहेत. आयकर सूट मर्यादा आता ७ लाखापर्यंत केली आहे. तर ३ लाखांपर्यंत उत्पन्नावर कोणताही कर आकारण्यात येणार नाही, अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे.
५ स्लॅबमध्ये ३ लाखांपर्यंत कोणताही कर नसेल. तसेच ३ ते ६ लाखांपर्यंत ५ टक्के, ६ ते ९ लाखांपर्यंत १० टक्के, ९ ते १२ लाखांपर्यंत १५ टक्के, १२ ते १५ लाखांपर्यंत २० टक्के आणि १५ लाखांवरील उत्पन्नावर ३० टक्के कर असेल, असे सीतारामन यांनी म्हटले आहे. या घोषणानंतर शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या भावना उंचावल्या आणि दोन्ही निर्देशांकांनी उसळी घेतली.
आजच्या व्यवहारात सेन्सेक्स ४४२ अंकांनी वाढून ५९,९९० वर गेला. तर निफ्टी १७,७८८ वर पोहोचला होता. आजच्या व्यवहारात येस बँक, व्होडाफोन आयडिया, पंजाब नॅशनल बँक, आयसीआयसीआय बँक, भारत इलेक्ट्रॉनिक्स पॉवर ग्रिड यांचे शेअर्स वधारले होते. दरम्यान, आज डॉलरच्या तुलनेत रुपया ०.१८ टक्के वाढून ८१.७७ वर खुला झाला. रुपया मागील सत्रात ८१.९२ वर बंद झाला होता.
























Join Our Whatsapp Group