पिंपरी (Pclive7.com):- कुरूळी येथे वेश्या व्यवसाय सुरू असलेल्या एका लॉजवर महाळुंगे पोलिसांनी छापा मारला. यामध्ये सहा महिलांची सुटका करीत पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

कुरुळी येथे ही कारवाई करण्यात आली. गौतम गणपत वाघमारे (२४, रा. भुसावळ), ऋषिकेश युवराज कदम (२२, रा. भोसरी. मूळ रा. पाटोदा बीड), इसराइल अब्दुल्ला पठाण (२४, रा. बेळगाव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह लॉज चालक दीपक जाधव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुरळी येथील शिवदीप लॉजमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती महाळुंगे पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी लॉजवर छापा मारून तिघांना ताब्यात घेतले. या कारवाईमध्ये पोलिसांनी सहा महिलांची वेश्या व्यवसायातून सुटका केली आहे. आरोपींनी पीडित महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
दरम्यान, लॉजवर छापा पडल्याचे माहिती होताच लॉज चालक दीपक जाधव याने लॉजमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे बॅकअप असलेला डीव्हीआर काढून घेतला. छाप्यात पोलिसांच्या हाती काही लागू नये यासाठी डीव्हीआर घेऊन दीपक पळून गेला असून महाळुंगे पोलीस पुढील तपास करीत आहेत.





















Join Our Whatsapp Group