पिंपरी (Pclive7.com):- जातीचा दाखला काढून देण्यासाठी तक्रारदाराकडे ४ हजारांची लाच मागणाऱ्या निगडीतील अप्पर तहसील कार्यालयातील डेटा एन्ट्री ऑपरेटरला पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी रंगेहात अटक केली आहे. ही कारवाई गुरुवारी (दि.२) दुपारच्या सुमारास करण्यात आली. शैलेश अकांबरी बासुतकर (वय ४१) असे अटक करण्यात आलेल्या या डेटा एन्ट्री ऑपरेटरचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांना त्यांच्या दोन लहान बहिणींचा जातीचा दाखला काढायचा होता. यासाठी निगडी अप्पर तहसीलदार कार्यालयातील डेटा एन्ट्री ऑपरेटर शैलेश यांनी तक्रारदाराकडे ४ हजारांची लाच मागीतली होती. याबाबत पुणे लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. यावर लाचलुचपत विभागाच्या पोलिसांनी गुरुवारी दुपारी निगडीतील अप्पर तहसील कार्यालयात सापळा रचून शैलेश याला पैसे घेताना रंगेहात अटक केली. पुढील तपास लाचलुचपत विभागाचे पोलीस निरीक्षक संदिप वऱ्हाडे तपास करत आहेत.






















Join Our Whatsapp Group