पिंपरी (Pclive7.com):- घाटकोपर मुंबई येथील राम निरंजन झुनझुनवाला कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स येथील प्राध्यापक डॉ.भूषण आरेकर आणि स्टीवन लोबो यांनी त्यांच्या राज्यशास्त्र विषयाची पदवी घेणा-या विद्यार्थ्यांसोबत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेस भेट देऊन महापालिकेच्या कामकाजाची माहिती घेतली.
यावेळी उप आयुक्त विठ्ठल जोशी यांनी महापालिकेची रचना, कामकाज तसेच प्रभाग रचना याबाबत माहिती दिली. यावेळी प्रशासन अधिकारी मुकेश कोळप, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांनी देखील विद्यार्थ्यांना विविध विभागातील चालणा-या कामकाजाविषयी माहिती दिली.
या भेटी दरम्यान फिरोज खान, आसमा शेख, ममता मौर्य, अस्मा खान, रमेश सय्यद, कृष्णकुमार यादव, तुळशी गुप्ता, भृंगराज पाबळे, सुरेश वाघमारे, आकांक्षा दळवी, अंकित सिंह, राहुल जयस्वाल, अवधेश पाल, रॉबीन पॉल, विवेक देठे, असद चौधरी, सुशील बि-हाडे, रोहित कांबळे यांनी महानगरपालिकेची माहिती घेतली व सायन्स पार्क आदी ठिकाणी भेट दिली.