पिंपरी (Pclive7.com):- चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नाना काटे यांची उमेदवारी आज जाहीर झाली आहे. मात्र या निवडणुकीत आता शिवसेनेचे राहुल कलाटे यांनी बंडखोरी करण्याची तयारी केली आहे. त्यामुळे चिंचवड मध्ये महाविकास आघाडी फूट पडण्याची शक्यता असून ही निवडणूक तिरंगी होणार असल्याचे चित्र आहे.

चिंचवड मधून राहुल कलाटे यांनी महाविकास आघाडीच्या वतीने उमेदवारी मागितली होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने आज नाना काटे यांना उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर राहुल कलाटे यांनी अपक्ष लढण्याची तयारी दर्शवली आहे. वाकड येथील त्यांच्या संपर्क कार्यालयाजवळ मोठ्या संख्येने कार्यकर्ते एकत्र आले आहेत. काही वेळातच कलाटे त्यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निघणार आहेत. जोरदार शक्तीप्रदर्शन ते यावेळी करणार आहेत.
गेल्या दोन निवडणुकांमध्ये चिंचवड मतदार संघातील जनतेने मला भरभरून प्रतिसाद दिला होता. यावेळेसही जनता माझ्या पाठीशी उभी राहील, असा विश्वास राहुल कलाटे यांनी पिंपरी चिंचवड लाईव्ह न्यूजशी बोलताना व्यक्त केला.
Tags: rahul kalate


















Join Our Whatsapp Group