चाकण (Pclive7.com):- चाकण येथील म्हाळूंगे गावातील एटीएम फोडून तब्बल ३९ लाख ५९ हजार ४०० लंपास झाल्याची घटना उघड झाली आहे. आज सकाळी साडे सहा वाजता धक्कादायक प्रकार घडला आहे.
चाकण येथील म्हाळूंगे गावात आयसीआयसीआय बँकेचे एटीएम आहे. आज सकाळी अज्ञात चोरट्यांनी गँस कटरच्या सहाय्याने हे एटीएम मशीन फोडले. त्यानंतर मशीन मधील तब्बल ३९ लाख ५९ हजार ४०० रूपयांवर या चोरट्यांनी डल्ला मारला. यावेळी या चोरट्यांनी तेथे लावण्यात आलेले सीसी टिव्ही कँमेरे देखील फोडून टाकल्याचे समोर आले आहे. चाकण पोलीस पुढील तपास करीत आहेत.






















Join Our Whatsapp Group