पिंपरी (Pclive7.com):- चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुक २०२३ च्या अनुषंगाने थेरगाव येथील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयामध्ये मुदतीत ४० उमेदवारांनी ५३ नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. यापैकी ३३ उमेदवारांचे नामनिर्देशन वैध ठरले असून ७ उमेदवारांचे नामनिर्देशन अवैध ठरले आहे. तर ५३ नामनिर्देशन पत्रा पैकी ४० नामनिर्देशन पत्रे वैध ठरली असून १३ नामनिर्देशन पत्रे अवैध ठरली आहेत.
चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुक २०२३ च्या अनुषंगाने दाखल झालेल्या नामनिर्देशन पत्रांची आज छाननी प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी यावेळी वैध आणि अवैध ठरलेल्या नामनिर्देशन पत्रांची घोषणा केली. चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुक २०२३ साठी नियुक्त करण्यात आलेले निवडणूक निरीक्षक एस. सत्यनारायण आणि निवडणुक पोलीस निरीक्षक अनिल किशोर यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या छाननी प्रक्रियेवेळी नामनिर्देशन पत्रे दाखल करणारे उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
नामनिर्देशन पत्रे वैध/ अवैध ठरलेल्या उमेदवारांच्या माहितीचा तपशील खालील प्रमाणे :-
१. अॅड. अनिल बाबू सोनावणे – अपक्ष – वैध
२. मिलिंद कांबळे – अपक्ष – वैध
३. अजय हनुमंत लोंढे – अपक्ष – वैध
४. रफिक रशिद कुरेशी – अपक्ष – वैध
५. अश्विनी लक्ष्मण जगताप – भारतीय जनता पार्टी – वैध
६. शंकर पांडुरंग जगताप – भारतीय जनता पार्टी
(बदली उमेदवार) – अवैध – मुख्य उमेदवार पात्र असल्याने बदली उमेदवारी अवैध
७. मोहन भागवत म्हस्के – अपक्ष – वैध
८. रवींद्र विनायक पारधे – अपक्ष – वैध
९. बालाजी लक्ष्मण जगताप – अपक्ष – वैध
१० – गोपाळ यशवंत तंतरपाळे – अपक्ष – वैध
११. अमोल (देविका) अशोक सूर्यवंशी – अपक्ष – वैध
१२. सिद्धीक इस्माईल शेख – अपक्ष – वैध
१३. किशोर आत्माराम काशीकर – अपक्ष – वैध
१४. डॉ. मिलिंदराजे दिगंबर भोसले – अपक्ष – वैध
१५. सोयलशहा युनुसशहा शेख – अपक्ष – वैध
१६. हरिश भिकोबा मोरे – अपक्ष – वैध
१७. जावेद रशिद शेख – अपक्ष – वैध
१८. राजेंद्र मारुती काटे – अपक्ष – वैध
१९. श्रीधर नारायण साळवे – अपक्ष – वैध
२०. राजू बबन काळे – अपक्ष – वैध
२१. विठ्ठल कृष्णाजी काटे – नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी – वैध
२२. सतिश श्रावण कांबिये – बहुजन मुक्ती पार्टी – वैध
२३. राहुल तानाजी कलाटे – अपक्ष – वैध
२४. चेतन मछिंद्र ढोरे – अपक्ष – अवैध – नामनिर्देशन पत्रासोबत प्रतिज्ञापत्र अपूर्ण सादर केले
२५. दादाराव किसान कांबळे – अपक्ष – वैध
२६. गणेश सुरेश जोशी – अपक्ष – अवैध – नामनिर्देशन पत्रात पुरेशा सुचकांची स्वाक्षरी नाही
२७. मनीषा मनोहर कारंडे – अपक्ष – वैध
२८. चंद्रकांत रंभाजी मोटे – अपक्ष – वैध
२९. सुधीर लक्ष्मण जगताप – अपक्ष – वैध
३०. तुषार दिगंबर लोंढे – बहुजन भारत पार्टी – वैध
३१. प्रविण अशोक कदम – संभाजी ब्रिगेड पार्टी – वैध
३२. सतिश नाना सोनावणे – अपक्ष – वैध
३३. मनोहर नामदेव पाटील – आम आदमी पार्टी – अवैध – नामनिर्देशन पत्र अपूर्ण तसेच B फॉर्म अपूर्ण
३४. प्रफुल्ला शैलेंद्र मोतिलिंग – महाराष्ट्र लोकहितवादी पार्टी – वैध
३५. मनोज मधुकर खंडागळे – आजाद समाज पार्टी (कांशीराम) – वैध
३६ – उमेश महादेव म्हेत्रे – अपक्ष – अवैध – नामनिर्देशन पत्रामध्ये आवश्यक असणारी चिंचवड विधानसभा मतदार संघातील सुचकांची नावे नाहीत
३७. भाऊ रामचंद्र अडागळे – अपक्ष – वैध
३८. सुभाष गोपाळराव बोधे – अपक्ष – वैध
३९. प्रकाश रामचंद्र बालवडकर – अपक्ष – अवैध – नामनिर्देशन पत्र अपूर्ण तसेच AB फॉर्म नाही
४०. संजय भिकाजी मागाडे – अपक्ष – अवैध – वैधानिक तरतुदीनुसार अनामत रक्कम भरलेली नाही
एकूण उमेदवार-४०
एकूण नामनिर्देशन पत्रे – ५३
पैकी वैध उमेदवार- ३३
वैध नामनिर्देशन पत्रे – ४०
पैकी अवैध उमेदवार- ०७
अवैध नामनिर्देशन पत्रे – १३
३३ उमेदवारांपैकी राष्ट्रीयकृत पक्षांच्या उमेदवारांची संख्या – २,
नोंदणीकृत पक्षांचे उमेदवार- ५
अपक्ष उमेदवार – २६