पिंपरी (Pclive7.com):- चिंचवड स्टेशन येथील रेल्वे उड्डाणपूलावरून येत्या आठवडाभरात बस व जड वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनांना खंडोबा माळ, महावीर चौक व भक्ती-शक्ती या पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे.

चिंचवड स्टेशन पुलावरून चिंचवडगाव, काळेवाडी, वाल्हेकरवाडी, थेरगाव व भोंडवे चौक, बिजलीनगर या ठिकाणाहून येणाऱ्या व जाणाऱ्या पीएमपीएल बस, सर्व प्रकारच्या बसेस आणि जड वाहनांना प्रवेश बंद होणार आहे. चिंचवड स्टेशन पुलावर प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. तसेच वाहतूक नियंत्रण करणेदेखील कठिण होत असल्यामुळे जड वाहनांना प्रवेश बंद करावा, अशी सूचना पिंपरी चिंचवड मनपाने चिंचवड वाहतूक विभागास दिली आहे. त्यामुळे पुलावर चिंचवड वाहतूक विभागाच्या वतीने सूचना फलक लावला आहे. ज्यामध्ये पर्यायी मार्गाचा वापर करण्याची सूचना दिली आहे. पुलावरून सायकल, दुचाकी व चारचाकी वाहनांना जाण्यास परवानगी आहे.
पिंपरी चिंचवड महापलिकेकडून आम्हाला पुलावरून जड वाहनांना प्रवेश बंद करावा, अशी सूचना दिली आहे. त्यानुसार, सध्या पुलावर तसा सूचना फलक लावण्यात आला आहे. येत्या पाच ते सहा दिवसांत जड वाहनांना पुलावर प्रवेश बंद करण्यात येणार आहे, अशी माहिती चिंचवड वाहतूक विभागाने दिली आहे.






















Join Our Whatsapp Group