पिंपरी (Pclive7.com):- चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ यांनी आज भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला आहे.

यावेळी शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, आमदार उमा खापरे, माजी खासदार अमर साबळे, चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप, एकनाथ पवार, अमित गोरखे, सदाशिव खाडे, सचिन पटवर्धन, नामदेव ढाके आदी उपस्थित होते.

पुनावळे, ताथवडे परिसरातून २०१२ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत शेखर ओव्हाळ हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर पहिल्यांदाच निवडून आले होते. या परिसरात ओव्हाळ यांना मानणारा मोठा वर्ग आहे. या पोटनिवडणुकीत भाजपाच्या उमेदवार अश्विनी जगताप यांना नक्कीच ओव्हाळ यांच्या भाजपा प्रवेशाचा मोठा फायदा होणार आहे.






















Join Our Whatsapp Group