पिंपरी (Pclive7.com):- महासंसदरत्न खासदार बाळासाहेबाची शिवसेना उपनेते श्रीरंग बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी युवासेनेच्या वतीने फुगेवाडी पुलाखाली सी.सी. टीव्ही कॅमेरा लावण्यात आले. त्याचे लोकार्पण भोसरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव ह्यांच्या हस्ते करण्यात आले.

ह्यावेळेस भास्कर जाधव म्हणाले की, समाजासाठी समाजउपयोगी कार्य करणे महत्वाचे आहे. यावेळेस भास्कर जाधव यांनी लावण्यात आलेल्या सी.सी. टीव्ही कॅमेराचे निरीक्षण केले. यावेळेस पिंपरी उपयुवा अधिकारी अविनाश जाधव, आरोग्य निरीक्षक जाधव, मुकुंद ओव्हाळ, संजय गरुड, प्रभाकर हिंगे, मनोज काची, चिंचपा निंगडॊळे, महेंद्र पोळके, अमर अडसुळे, करण काळे, सोन्या साळवे, उपस्थित होते. कार्यक्रमचे आयोजन पिंपरी युवा अधिकारी निलेश हाके यांनी केले होते.






















Join Our Whatsapp Group