चिंचवड (Pclive7.com):- चिंचवड विधानसभा मतदार संघात आज रविवार दि. २६ फेब्रुवारी रोजी मतदान सुरु आहे. सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत चार तासात १०.४५ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. दरम्यान सकाळी ९ वाजेपर्यंत ३.५२ टक्के मतदान झाले होते.

चिंचवड मतदार संघामध्ये एकूण ५ लाख ६८ हजार ९५४ मतदार असून ५१० मतदार केंद्रावर मतदान होणार आहे. २६ फेब्रुवारी रोजी होत असलेल्या मतदान प्रक्रियेसाठी सुमारे ३ हजार अधिकारी-कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. मतदानादिवशी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असुन सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. यासाठी ३७०७ पोलीस कर्मचारी व ७२५ अधिका-यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान मतदारसंघातील वयोवृध्द मतदार तसेच दिव्यांगांसाठी मतदान केंद्रावर विशेष सहायकासह व्हील चेअरची व्यवस्था करण्यात आली आहे. ते देखील मताधिकार बजावत आहेत.
चिंचवड विधानसभा मतदारसंघातील २५५ मतदान केंद्रावर वेबकास्टींगच्या सहाय्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. थेरगाव येथील शंकर आण्णा गावडे कामगार भवन मधील नियंत्रण कक्षातून संपूर्ण मतदान प्रक्रीयेवर लक्ष ठेवले जात आहे. या कक्षाला निवडणूक निरीक्षक एस. सत्यनारायण यांनी भेट देऊन पाहणी केली. तसेच काही मतदान केंद्रांना देखील ते भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी करीत आहे.






















Join Our Whatsapp Group