पिंपरी (Pclive7.com):- घरकुलचा ताबा नागरिकांना त्वरित मिळावा अशी मागणी स्विकृत सदस्य दिनेश यादव यांनी केली आहे. पिंपरी चिंचवड महापालिका झोपडपट्टी पुनर्वसन विभागाच्या सह उपायुक्त सुषमा शिंदे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे यादव यांनी ही मागणी केली आहे.

चिखली, चऱ्होली, मोशी या भागात पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने गोरगरीब लोकांसाठी घरकुल योजना राबविल्या आहेत. अनेक ठिकाणी घरकुल तयार आहेत, पण किरकोळ कामे पूर्ण झाली नसल्याने अध्यापही गोरगरीब जनतेला ह्या घराचा ताबा मिळालेला नाही.

काही नागरिकांनी कर्ज घेऊन घरांसाठी पैसे भरले आहेत. त्या कर्जाचे हप्ते सुरू झाले आहेत. तसेच भाड्याच्या घरात राहत असल्याने घराचे भाडे असा दुप्पट भुर्दंड नागरिकांना सोसावा लागत आहे. यासाठी महानगरपालिकेने लवकरात लवकर राहीलेली कामे पूर्ण करावीत व नागरीकांना घरे ताब्यात द्यावी अशी मागणी दिनेश यादव यांनी झोपडपट्टी पुनर्वसन विभाग प्रमुख सुषमा शिंदे यांच्याकडे केली आहे.
























Join Our Whatsapp Group