पिंपरी (Pclive7.com):- काळेवाडी आणि चिखली परिसरातून पोलिसांनी ३ लाखांचा गुटखा जप्त केला आहे. गुन्हे शाखा युनिट २ आणि वाकड पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
पोलिसांनी याप्रकरणी महेंद्र हिरालाल पवार (२४, रा. चिखली) याला अटक करण्यात आली असून, त्याच्यासह देवा राम देवासी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस शिपाई उद्धव खेडकर यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी महेंद्र पवार याने त्याच्या किराणा दुकानामध्ये गुटखा साठवून ठेवला याबाबत माहिती मिळाली असता पोलिसांनी छापा मारून दोन लाख २३ हजार ८२१ रुपयांचा गुटखा आणि तंबाखू असा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांची चाहूल लागतात देवा राम देवासी हा पळून गेला आहे. चिखली पोलिस तपास करीत आहेत.
दुसऱ्या कारवाईत प्रदीप मांगीलाल गुप्ता (४४, रा. काळेवाडी) याला अटक करण्यात आली आहे. पोलिस हवालदार प्रमोद कदम यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी प्रदीप याने ८९ हजार ३३३ रुपये किमतीचा गुटखा विक्रीच्या हेतूने बाळगला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.