पुणे (Pclive7.com):- राज्याचे दिवगंत गृहमंत्री आर. आर. पाटील (आबा) यांची कन्या राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या विद्यमान अध्यक्ष स्मिता पाटील आता दौंडच्या सूनबाई होणार आहेत.
पुणे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांचे पुतणे आनंद थोरात यांच्याशी त्या मे महिन्यात विवाहबद्ध होणार आहेत. हे नाते होण्याकरिता खुद्द माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी पुढाकार घेतला असल्याची माहिती रमेश थोरात यांनी दिली. थोरात म्हणाले, आपले बंधू प्रभाकर थोरात यांचा मुलगा आनंद यांच्याशी ती विवाहबद्ध होणार आहे.
आनंदने परदेशातून शिक्षण पूर्ण केले असून सध्या पुण्यात व्यवसायामध्ये कार्यरत आहे. आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर शरद पवार यांनी स्मिता यांच्याकडे युवती काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली आहे.