पिंपरी (Pclive7.com):- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकप्रिय ठरलेला ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या यशस्वी १०० व्या प्रसारणानिमित्त संभाजीनगर येथे महिलांसाठी मोफत पाककला प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या पाककला शिबिराचे उद्घाटन नगरसेविका अनुराधा गोरखे, सोनाली तुषार हिंगे, डॉ अंकिता सोनवणे, प्रतिभा जेऊरकर, डॉ. संध्या लोंढे यांच्या हस्ते पार पडले. या शिबिराला महिलांनी चांगला प्रतिसाद दिला.

नोव्हेल्स हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजचे शेफ यशवंत साटणकर यांनी ब्राऊन ग्रेव्ही व्हेज बूना, टोमॅटो ग्रेव्ही पनीर, बटर मसाला, वाईट ग्रेव्ही मेथी मटर मलाई व बऱ्याच काही रेसिपीज घरी कशा बनवू शकतो याविषयी अत्यंत चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केले.
याप्रसंगी ‘मन की बात’चे पश्चिम महाराष्ट्राचे संयोजक अमित गोरखे म्हणाले की, नरेंद्र मोदी यांचा संपूर्ण भारतभर यशस्वी ठरलेला ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या १०० व्या प्रसारणानिमित्त हा आगळावेगळा उपक्रम करण्यात आला. याला महिलांनी चांगला प्रतिसाद दिला. महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हेच या कार्यक्रमाचे यश ठरले. नरेंद्र मोदी यांच्या कामाची दखल प्रत्येक महिलेने या निमित्ताने ‘मन की बात’ या कार्यक्रमात घेतली.
प्रशिक्षण शिबिरादरम्यान सर्व महिलांना नरेंद्रजी मोदी यांचा ‘मन की बात’ या कार्यक्रमाचा १०० वे प्रसारण दाखविण्यात आले. प्रशिक्षण वर्गाच्या सर्व महिलांना या प्रशिक्षणाचे मोफत नोट्स देण्यात आल्या. कार्यक्रमाला भाजपा प्रदेश सचिव अमित गोरखे, माजी उपमहापौर तुषार हिंगे, भानुदास नेटके, अजित भालेराव, सुशांत भिसे, सचिन गायकवाड उपस्थित होते.
























Join Our Whatsapp Group