पिंपरी (Pclive7.com):- आज १ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत, महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांच्या वतीने हुतात्मा व महापुरूष यांचे स्मरण रहावे म्हणून महापुरुषांच्या पुस्तकाचे संच वाटप करण्यात आले.

ही पुस्तके क्रांतीवीर चापेकर गुरुकुल, चिंचवड या ठिकाणी अनाथ आश्रमातील मुलांना पद्मश्री गिरिश प्रभुणे सर यांच्याकडे तर खिवंसरा पाटील विद्या मंदिर गणेशनगर थेरगाव पुणे येथील विद्यार्थ्यांना शाळेचे प्राचार्य नटराज जगताप सर व शिक्षक वर्ग यांच्याकडे सुपुर्त करण्यात आली.

यावेळी विद्यानंद मानकर सर सरचिटणीस -महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक सेना महाराष्ट्र राज्य तसेच हेमंत महादेव डांगे प्रदेश उपाध्यक्ष -महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना महाराष्ट्र राज्य, अनिकेत परशुराम प्रभु शहर अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना पिंपरी-चिंचवड, ओंकार पाटोळे, सिध्देश सोनकवडे उपशहर अध्यक्ष, किरण पाटील, प्रज्योत पुजारी, आकाश फंड, राहुल सरवदे, अनिल घोडेकर, यश कुदळे, गणेश डांगे हे उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group