पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील भाजपाचे निष्ठावंत ज्येष्ठ कार्यकर्ते व माजी शहराध्यक्ष सदाशिव दादासाहेब खाडे यांची महाराष्ट्र प्रदेश भाजपा कार्यकारणी सदस्य पदी निवड करण्यात आली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सदाशिव खाडे यांना मुंबईतील एका बैठकीत नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार केला आहे.

सदाशिव खाडे यांनी भाजपा मध्ये युवा मोर्चाचे वॉर्ड अध्यक्ष पदापासून पासून काम केले आहे. भाजपा युवा मोर्चाचे शहर उपाध्यक्ष, पिंपरी चिंचवड शहर जिल्हा अध्यक्ष, प्रदेश कार्यकारिणीवर निमंत्रित सदस्य या पदांवर काम केले आहे. आता ६४ मान्यवरांचा समावेश असणाऱ्या भाजपा प्रदेश कार्यकारिणीवर पिंपरी चिंचवड शहरातून एकमेव सदाशिव खाडे यांची निवड करण्यात आली आहे. खाडे यांनी यापूर्वी पिंपरी चिंचवड शिक्षण मंडळ सदस्य, प्रादेशिक दुय्यम सेवा निवड मंडळाचे सदस्य तसेच पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण समितीचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) या विविध पदांवर देखील काम केले आहे.
खाडे यांच्या शहराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भव्य सभा पिंपरीतील एचए ग्राउंड वर आयोजित करण्यात आली होती. तसेच माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या संघर्ष यात्रेतील राज्यातील सर्वात मोठी सभा पिंपरीत खाडे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आली होती. भाजपा प्रदेश कार्यकारिणीवर खाडे यांची निवड झाल्यामुळे शहर भाजपामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
























Join Our Whatsapp Group