पिंपरी (Pclive7.com):- केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीचा (सीबीएसई) निकाल शुक्रवारी १२ मार्च रोजी जाहीर करण्यात आला. चिंचवड येथील नाॅव्हेल इंटरनॅशनल स्कूल मधील दहावीच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत यश मिळविले.

पार्थ तानाजी गर्दी याने ९४ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला. तसेच केदार गोपाल वैजे द्वितीय क्रमांक (९३.६ टक्के), सार्थक गमे तृतीय क्रमांक (९२.८ टक्के) गुण मिळवून पाचवा क्रमांक मिळवला आहे.

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अमित गोरखे व विश्वस्त विलास जेऊरकर यांनी शाळा व्यवस्थापक सौ. प्रिया गोरखे, प्राचार्य तसेच सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
























Join Our Whatsapp Group