कोलकाता – पाचव्या दिवशी रंगतदार झालेला भारत-श्रीलंका कसोटी सामना अनिर्णीत राहिला. श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी भारताने ३५२ धावांवर डाव घोषित केला. विराट कोहलीच्या शतकाच्या जोरावर भारतीय संघाने लंकेसमोर २३१ धावांचे आव्हान ठेवले. या धावांचा पाठलाग करताना लंकेचे सात फलंदाज माघारी धाडण्यात भारतीय गोलंदाजांनी यश आले. भारतीय गोलंदांजाच्या आक्रमक माऱ्यामुळे विजय दृष्टीपथात असताना अपुऱ्या प्रकाशामुळे सामना रोखण्यात आला. यामुळे भारताची विजयाची संधी थोडक्यात हुकली.
भारतीय गोलंदाजांनी दुसऱ्या डावात भेदक मारा करत श्रीलंकेच्या फलंदाजीचा धुव्वा उडवला. भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेला बॅकफूटवर टाकले. दिनेश चंडीमल आणि निरोशन डीकवेलाचा वगळता एकाही लंकेच्या फलंदाजाला भारतीय गोलंदाजीचा सामना करता आला नाही. ७५ धावांवर ७ गडी बाद झाल्यावर लंकेच्या संघाने अपुऱ्या प्रकाशाची पंचाकडे तक्रार केली. यानंतर दोन्ही संघाच्या सहमतीने सामना थांबवण्यात आला. दुसऱ्या डावामध्ये भारताकडून भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शामीने भेदक गोलंदाजी केली. भुवनेश्वरने चार विकेट घेतल्या. तर मोहम्मद शामीने दोन आणि उमेश यादवने एक गडी बाद केला. दोन्ही डावांमध्ये मिळून ८ विकेट घेणाऱ्या भुवनेश्वर कुमारला सामनावीरचा पुरस्कार देण्यात आला.
तत्पूर्वी पाचव्या दिवसाच्या सुरुवातीला श्रीलंकेने सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. रविचंद्रन आश्विन आणि वृद्धीमना साहाला दसुन शनकने बाद केले. पेरेराच्या उसळत्या चेंडूवर जाडेजा झेल बाद झाल्याने भारताला पाचवा धक्का बसला होता. सुरंगा लकमलने एकाच षटकात चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेला तंबूत धाडत भारताला चौथा धक्का दिला होता. रहाणे बाद झाला तेव्हा भारताची धावसंख्या ४ बाद २१३ अशी झाली होती. त्याआधी लकमलनेच सलामीवीर के एल राहुलच्या त्रिफळा उडवून लंकेला दुसरे यश मिळवून दिले. राहुलने कालच्या त्याच्या वैयक्तिक धावसंख्येत ५ धावांची भर घालून ७९ धावांवर तो बाद झाला.
श्रीलंकेविरुद्ध सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात चेतेश्वर पुजाराने नवा रेकॉर्ड बनवला आहे. सामन्याच्या सलग ५ व्या दिवशी देखील फलंदाजी केली आहे. तर कर्णधार विराट कोहलीने कसोटीतील १८ वे तर आंतराष्ट्रीय कारकिर्दीतील ५० वे शतक ठोकले.






















Join Our Whatsapp Group