पिंपरी (Pclive7.com):- चिखली गावात अज्ञाताने एकावर गोळीबार केल्याची घटना घडली. यात त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सोन्या तापकीर असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. आज सोमवार (दि.२२) दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडल्याचे चिखली पोलिसांनी सांगितले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयातील चिखली परिसरात दुचाकीवरून आलेल्या दोघांनी सोन्या तापकीर याच्यावर गोळ्या भरदिवसा गोळ्या झाडल्या. यात तो गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते.

उपचारादरम्यान सोन्या तापकीर यांचा मृत्यू झाला आहे. गोळीबाराचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. भरदिवसा घडलेल्या घटनेमुळे पिंपरी-चिंचवड शहरात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.






















Join Our Whatsapp Group