पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या उद्यान विभागातील सहाय्यक उद्यान निरीक्षक १७ हजार ५०० हजाराची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडल आहे.
मागील काही दिवसांपासून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विविध विभागामध्ये लाचलुचपत विभागाने धाडी टाकून कर्मचाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडल आहे. त्यातच आज नेहरूनगर येथील महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण पुष्प उद्यान विभागाचे सहाय्यक निरीक्षक किरण मांजरे यांनी एका ठेकेदाराला लाच मागितली होती.
त्यासंदर्भाची तक्रार लाच लुचपत विभागाकडे तक्रार आल्यानंतर, आज लाचलुचपत विभागाने धाड टाकून सहाय्यक उद्यान निरीक्षक किरण मांजरे याला लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे.