पिंपरी (Pclive7.com):- वाकड येथील सुरज भुजबळ व प्रमोद भुजबळ यांच्या सर्वात मोठ्या ‘जस्ट फिट स्टुडिओ’ या जिमचे उद्घाटन आमदार अश्विनीताई लक्ष्मण जगताप व महेशदादा लांडगे यांच्या हस्ते झाले.
या प्रसंगी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे सिने अभिनेते भरत लिमन, माजी नगरसेवक शंकरशेठ जगताप, नाना काटे, शंकरभाऊ मांडेकर, विशालआप्पा कलाटे, विनोदशेठ वाकडकर, संतोषअण्णा लोंढे, भारतीताई विनोदे, विनायक गायकवाड,
विक्रम वाघमारे, संतोषदादा कलाटे, श्यामशेठ वाकडकर, गणेश कस्पटे, अनिल भूमकर, सागर आंघोळकर, विजय दर्शले, अमोल कलाटे, तानाजी हुलावळे, चेतन घुले, आदी मान्यवर उपस्थित होते. भाजपा नेते रामशेठ वाकडकर यांनी सर्वांचे आभार मानले.