पिंपरी (Pclive7.com):- दरवर्षीप्रमाणे श्री क्षेत्र देहू व आळंदी येथुन पंढरपूर पायी वारीसाठी जाणाऱ्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांच्या सोयीसाठी नाना काटे सोशल फाऊंडेशनच्या वतीने पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची व्यवस्था तसेच वारकऱ्यांच्या प्रथमोपचारासाठी तसेच तातडीच्या वैद्यकीय सेवेसाठी रुग्णवाहिका यांची आज नाना काटे यांच्या हस्ते पुजा करुन वारकऱ्यांच्या सेवेसाठी पाठवण्यात आले.

यापूजेप्रसंगी ह.भ.प.विलासराव काटे, श्री.माऊली काटे, श्री.अर्जुन काटे, विठ्ठल रुक्मिणी वारकरी संस्थेचे अध्यक्ष श्री.गणेश साहेबराव काटे, उद्योजक श्री.संदिप जगताप, उद्योजक श्री.गणेश काटे, श्री.विशाल काळे, श्री.प्रशांत (आबा) शिंदे उपस्थित होते.

























Join Our Whatsapp Group